त्या दिवशी सकाळ पासून खूपच गडबड होती, माझा उपवास होता. कामाच्या गडबडीत काहीच उपवासाचे बनवलं नाही. सकाळी नाश्त्याच्या वेळेला खूप भूक लागली कि आतून चिडचिड सुरु होते. मग काय.. असं वाटतं की सगळेजण आपल्यावर अन्याय करत आहेत. आपण बिचाऱ्या म्हणून सहन करतोय फक्त.
आणि मग सुरु होतं नेगेटिव्ह विचारांचं सत्र. आपला मेंदू कसा आहे बघा ना… इथे subtraction आणि division नाही. आहे फक्त आहे फक्त addition आणि multiplication. कोणतेही वाईट विचार वाढतच जातात. खोटं वाटतंय का?
एक experiment करा लगेच. पुढच्या ६० सेकंद माकडाचा विचार करू नका अजिबात. केला का? बरॊबर माकडच दिसणार तुम्हाला. असाच आहे हा मेंदू. लगेच लक्षात आलं आणि मग स्वतःला म्हटले कि आपल्याला अश्या negative विचारांच्या सत्रात अडकायचं नाहीये.
सर्व राहिलेलं काम बाजूला ठेवलं, मस्त राजगिऱ्याच्या लाडू घेतला, त्यावर थोडं दूध घातलं आणि ड्राय फ्रुट टाकले. बाउल घेऊन गॅलरी मध्ये आले. डोंगरांकडे बघत नाश्ता संपवला. आणि आपोआपच मूड change झाला. उरलेलं काम अर्ध्या वेळेत झाले.
आपली काळजी घेतली कि नेहमीच सगळं व्यवस्थित होतं असा माझा अनुभव आहे. परंतु आपण आपली काळजी घ्यायला नेहमीच मागेपुढे बघतो. आपली काही ठरलेली वाक्य असतात. “आरशात? छे कोणाला वेळ आहे बघायला?”, ” कपडे काय बदलायचे इथेच जायचं आहे ना?” “केस विंचरायची गरज नाही तसे नीटच आहेत, बन घातला कि समजत सुद्धा नाही. “,”व्यायामाला कसला वेळ मिळतोय? एव्हडा काम करते त्यातच होतो व्यायाम.” , “बाळाची आई म्हटल्यावर कसला आलाय निवांतपणा?” “नाश्त्याला मी पटकन काहीतरी खाते.” “मला ना अडकल्यासारखा वाटतं असाच दिवस येतो आणि संपतो देखील. “
अशी तुमची नेहमीचीच वाक्य असेल तर थांबा थोडं. तुमचा वेळ आहे हा. कामाच्या गराड्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. self care वर कितीही निबंध लिहा पण जेव्हा “Jab We Met ” मधली करीना हा dialogue म्हणते तेंव्हा मनाला भिडते ना?
मग आपण आपल्या favorite का नाही? का आपल्याला जमत नाही आपली काळजी घ्यायला. आता म्हणाल कसं करायचं? पहिले स्वतःवर विश्वास ठेवा. आणि तुमच्या दिवसातील कामातून अर्धा तास काढा. तेंव्हा कोणताही गॅजेट नाही आणि काही नाही. स्वतःचा विचार करा. स्वतःच्या छंदाला वेळ द्या किंवा नुसता शांत बसा. जेव्हा स्वतःला वेळ मिळेल तेंव्हा आपोआपच मार्ग दिसतील.
मुद्दा काय आहे? कितीही आयुष्यात गडबड असूदेत, स्वतःला शारीरिक, मानसिक दृष्ट्या सुंदर बनवलं कि तुमचा आत्मविश्वास वाढेल. लहान किंवा मोठे, घरकाम किंवा करिअर चा विचार, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुमचा आत्मविश्वास आणि कामाचा उत्साह वाढेल आणि घेतलेला pause सत्कारणी लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचं – सुंदरता प्रत्येक रूपात येते. रंग आकार सुंदरता ठरवत नाहीत. जेव्हा स्वतःची काळजी घ्याल आणि स्वतःचे favorite व्हाल तेंव्हा आपोआपच खुश राहाल आणि ते तुमच्या रूपात झळकेल. :)मग कोणी म्हटलं की “किती सुंदर दिसतेस वेगळंच तेज दिसतंय, काय विशेष ?” तेंव्हा मला येऊन नक्की सांगा.
१. स्वतःला “me time”द्या
२. Self care आवश्यक आहे. पौष्टिक अन्न, व्यायाम, वाचन आणि ध्यान या सवयीनीं मला खूप बळकट बनवले आहे. तुमची लिस्ट वेगळी असू शकते. ती शोधून काढा.
३. Self care Is not selfish.
४. रोज सकाळी उठल्यावर तोंड धुताना स्वतःला म्हणा “
में अपनी favorite हूँ !!”
आता शेवटी माझ्या favorite character( Harvy Spector ) चा वाक्य
” Ever loved someone so much, you would do anything for them? Yeah, well make that someone yourself and do whatever the hell you want”.
मंजिरी चव्हाण